पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १० मार्च
अलिकडील काळात ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्या व बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
स्त्रीभ्रूणहत्या व बालविवाहाचे वाढते प्रमाण कमी तसेच खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील महिला, विद्यार्थीनी व सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचे संरक्षण देण्याबरोबरच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जातील. असे प्रतिपादन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी केले. जामखेड पोलिस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्यावतीने
खर्डा पोलीस स्टेशन येथे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिन हा ८ मार्च रोजी असतो मात्र ८ मार्चला खर्डा पंचक्रोशीतीचे ग्रामदैवत असलेल्या कानिफनाथांची यात्रा असल्याने हा कार्यक्रम काल दि. १० मार्च रोजी घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी खर्डा गावच्या सरपंच नमिता गोपाळघरे, पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड, जातेगावच्या महिला पोलीस पाटील, खर्डा ग्रामपंच्यातीच्या उपसरपंच लोखंडे, व महिला सदस्या जावळे, पाटील , शिंदे , मोरे , पैठणपगार, जावळे ,कांबळे, निकम व ग्रामपंचायतच्या कामगार महिला यांच्यासह सर्व स्तरावरचे महिलांचा खर्डा पोलीस स्टेशनचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी यथोचित सत्कार केला.
यावेळी पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर
म्हणाले की. समाजातील पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक व पोलीस प्रशासन असे आपण मिळून एका चांगल्या समाज निर्मितीसाठी काम केले तर आपल्या परिसरातील गुन्हेगारी नक्कीच नियंत्रणात राहु शकते. त्यामुळे आपण सर्वजण मिळून चांगले काम करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच महिलांच्यावतीने संपादीका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांचा सन्मान हा फक्त एक दिवसासाठी नाही तर वर्षातील ३६५ दिवसां करावा. आजच्या काळात महिलांनी सक्षम होणं खूप गरजेचं आहे. तसेच आता महिला सुरक्षितेचा विषय राहिला नाही. आपल्याकडे २४ तास काम करणारे खर्डा पोलीस स्टेशन व नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे आहेत. जर आपल्याला काही अडचण आली तर तुम्ही इथे येऊन सांगू शकता. तसेच आवश्यकतेनुसार मी ही
माझ्या वर्तमानपत्रातून तुमच्या प्रश्नांना व अडचणीसाठी नेहमी मदत करण्यास तत्पर आहे. मी जेव्हा पत्रकारितेमध्ये आले होते. तेव्हा मला पण असे वाटायचे की एवढे सगळे पुरुष आहेत आणि एक महिला मीच कसं काम करणार. माझ्या वडिलांची शिकवण होती की निर्भीडपणे राहणे. त्याच प्रकारे मी आज पत्रकारिता करत आहे. जामखेड तालुक्यामध्ये फक्त मी एकटीच महिला पत्रकार आहे. यावेळी महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचेही आभार व्यक्त केले. व त्यांना पण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल आयोध्या पोकळे यांनी केले
No comments:
Post a Comment