पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १० मार्च
जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना गुप्त माहितीनुसार जामखेड शहरातुन साकतकडे जाणाऱ्या एक व्यक्तीस अडवून चौकशी केली असता तो इसम हा देशी विदेशी दारुची विक्री करण्यासाठी बुलेट वरुन चोरुन दारूची विना परवाना वाहतुक करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्या इसमाकडून देशी विदेशी दारूसह ९६०४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली की, जामखेड शहरातुन साकतकडे एक इसम हा देशी विदेशी दारुची विक्री करण्याची बुलेटवरून चोरुन विना परवाना वाहतुक करत आहे, आत्ता गेल्यास सदर इसम हा मुद्देमालासह मिळुन येईल. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी लगेचच जामखेड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक रवाना करुन सदरची बुलेट मार्केट यार्ड येथे येताच पथकाने सापळा रचुन सदर इसमास अडवुन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे एकुण १६०४० /- रु. किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व ८०,००० /- रु. किंमतीची बुलेट मोटारसायकल असा एकुण ९६०४० /- रु. मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर पोकॉ. विजय कोळी यांच्या फिर्यादीवरुन सदर इसम आरोपी - विनोद शहाजी इंगळे (वय २९) रा. हापटेवाडी ता. जामखेड याचे विरुध्द मुंबई दारुबंदी अधिनियमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संग्राम जाधव करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संग्राम जाधव, अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल विजय कोळी, अरुण पवार, संदिप राऊत, संदिप आजबे, सचिन सगर यांचे पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment