पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ९ मार्च
जामखेड शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची मोटारसायकल चोरून दोन मोटारसायकलचोर खर्डाच्या दिशेने येत असलेले दिसल्याने खर्डा पोलीस स्टेशनच्या पेट्रोलिंग पथकाने मोठ्या शिताफीने ३ ते ४ किमी पाठलाग करून मोटारसायकल हस्तगत केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दि. ८ मार्च रोजी खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल शशी म्हस्के, चालक पोलीस काॅन्स्टेबल दराडे हे खर्डा शहरात पेट्रोलिंग करत असताना रात्री २:३० वाजताचे सुमारास एक मोटारसायकलवर दोन आज्ञात इसम संशयास्पद रितीने येताना दिसल्याने पोलीस काॅन्स्टेबल म्हस्के यांनी त्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता. ते न थांबता भरधाव वेगाने निघुन गेले. त्यामुळे सदर मोटरसायकल वरील चोरांचा ३ ते ४ किलोमीटर पाठलगा केला असता. यातील गाडीवरील आज्ञात ईसमांनी गाडी सोडुन आंधाराच फायदा घेवुन पसार झाले . त्यांनतर सदर गाडी पोलीस स्टेशन आणल्या नंतर तीचे बाबत चौकशी केली असता. ती गाडी चिचोंडी पाटील येथील हारुन मनियार यांची असून व त्यांचा मुलगा हा शिक्षणासाठी जामखेड येथे असल्याने तो ती वापरत आहे. ही मोटारसायकल त्याचे रुम समोरुन आज्ञात दोन ईसम चोरुन घेवुन चालले होते. खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल शशी म्हस्के, चालक पोलीस काॅन्स्टेबल दराडे यांचे सतर्कतेमुळे ही गाडी मिळुन आली.
सदर कारवाई साठी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शशी म्हस्के, चालक पोलीस काॅन्स्टेबल दराडे, वैजिनाथ मिसाळ, आवारे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment