पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ८ मार्च
तालुक्यातील पत्रकार, वकिल व कायद्याचा सन्मान करणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करणार असल्याचे सुतोवाच जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने आलेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.
जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याबरोबर कायदा सुव्यवस्थेचा बाबतीत सर्वच पातळीवर यशस्वी ठरलेले पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची पारनेर पोलीस स्टेशनला झालेल्या बदलीनंतर जामखेड पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे विविध पक्षसंघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विविध प्रकारे स्वागत व सत्कार केले जात आहेत. याच अनुषंगाने नगर व्हिजन न्युज नेटवर्कचे संपादक संजय वारभोग व पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जामखेड तालुक व पोलीस स्टेशन हद्दीतील विविध माध्यमांचे पत्रकार, वकिल व कायद्याचा सन्मान करणाऱ्या सर्वच समाज घटकातील नागरिकांना सोबत घेऊन आपल्याला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करायचे आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सत्कार करण्यासाठी आलेले विविध घटकातील मान्यवर उपस्थित होते.
चौकट
आज दि. ८ मार्च जागतिक महिला दिन. याचे स्मरण ठेवून जामखेड तालुक्यात धडाडीने काम करणाऱ्या पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांचाही पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आदरपूर्वक सन्मान करत यथोचित सत्कार केला.
No comments:
Post a Comment