पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १४ मार्च
जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील भुसार मालाचे आडत व्यापाऱ्यास कट करून लुटणाऱ्या तिन जणांच्या टोळीला अटक करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पथकाने सदर गुन्हेगारांकडून रस्ता लुटीतील १० लाख रुपयांपैकी ७ लाख १० हजार रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल जप्त करुन यातील आरोपी गणेश सुभाष कांबळे (वय १९), तुषार उर्फ सोन्या दिपक आल्हाट (वय १९), पृथ्वीराज उर्फ बबलु बाळासाहेब चव्हाण (वय २०), तिघेही रा. सोनेगांव ता. जामखेड या अरोपींना जेरबंद करून पुढील कार्यवाहीसाठी खर्डा पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. विशेष म्हणजे या सदर गुन्हात आडत व्यापाऱ्याच्या विश्वासू नोकराचाही समावेश असल्याचे समोर आले आहे
सविस्तर असे की, फिर्यादी दत्तात्रय कुंडलीक बिरंगळ (वय ४७) धंदा शेती व आडत रा. सोनेगांव ता. जामखेड. हे सोनेगाव व परिसरातील शेतकऱ्यांकडून भुसार मालाची खरेदी करुन सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी येथे विक्री करण्याचा व्यवसाय आहे.
दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजताचे सुमारास फिर्यादी दत्तात्रय बिरंगळ व दुकानाचा हमाल असलेला व या गुन्ह्यातील आरोपी गणेश कांबळे रा. सोनेगांव असे दोघे बार्शी येथे भुसार मालाची विक्री करुन मालाचे १० लाख रुपये घेऊन मोटारसायकलवरुन येत असतांना जामखेड तालुक्यातीलच धनेगांव शिवारातील लोहकरे वस्ती येथे आले असता दोन बुरखाधारी अनोळखी इसमांनी त्यांचेकडील विना नंबरच्या प्लॅटिना मोटारसायकल वरुन येऊन फिर्यादीस पाठीमागून बांबुच्या दांडक्याने मारहाण तर मोटारसायकल चालक गणेश कांबळेस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस ढकलून देऊन दोन्ही आरोपींनी फिर्यादीस दांडक्याने मारहाण करुन हातातील १० लाख रुपये असलेली पिशवी ओढली परंतु ती न निघाल्याने हल्लेखोरांनी हातातील लोखंडी कोयत्याचे उलटे बाजूने फिर्यादीचे डोक्यात मारुन जखमी केले व. १० लाख रुपये बळजबरीने चोरुन नेलेवरुन खर्डा पोलीस स्टेशनला गु. र. नं. 44/2023 भादवी कलम 394,34 नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गंभीर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक
राकेशकुमार ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे गुन्ह्याचा तपास देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश दिला. त्यानुसार अनिल कटके यांनी पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन कारवाई करणेकामी रवाना केले. पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हयात फिर्यादी बिरंगळ यांचेकडेच काम करणारा हमाल गणेश कांबळे हाही सामिल असून त्यानेच आपल्या दोन साथीदारांना फिर्यादी व तो स्वत: रोख रक्कम घेऊन येत असल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीच्या व पुराव्यांच्या आधारे शोध पथकाने सदर गुन्ह्यातील दोन्ही पाठलाग करुन पकडले मात्र त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन व परिस्थीतीजन्य पुराव्याची जाणीव करुन दिली असता, त्यांनी वरील नमुद गुन्हयाची कबूली देवून त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले रकमेपैकी ७ लाख १० हजार रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल जप्त करुन यातील आरोपी गणेश सुभाष कांबळे (वय १९), तुषार उर्फ सोन्या दिपक आल्हाट (वय १९), पृथ्वीराज उर्फ बबलु बाळासाहेब चव्हाण (वय २०), तिघेही रा. सोनेगांव ता. जामखेड या अरोपींना पुढील कारवाईसाठी खर्डा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक
सोपान गोरे, उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, हेडकॉन्टेबल सुनिल चव्हाण, बापू फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप पवार, संदीप घोडके, पोना. शंकर चौधरी, भिमराज खर्से, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, काॅन्स्टेबल विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, चालक पोलीस हेडकॉन्टेबल उमाकांत गावडे,चंद्रकांत कुसळकर, चालक पोलीस नाईक भरत बुधवंत यांचे पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याबाबत पुढील कार्यवाही खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.
No comments:
Post a Comment