जामखेड प्रतिनधी/29 जुलै2025
कोणत्या ना कोणत्या कारणाने मारहाणीचे प्रकार वाढतच चालले आहेत. कायदा हातात घेण्याचे धाडस वाढतच चालले आहे. नूकतेच जामखेड तालुक्यातील ऊसतोडणी कामगाराला मूकादम व आनोळखी तीन जणांकडून पैसाच्या घेण्यादेण्याच्या कारणावरून जबरदस्त मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर कामगाराने दोन लाख उचल घेतली एक फेडले एक लाख बाकी घेण्यासाठी मुकादमाने उचलून नेवून जबर मारहाण केल्याचा गून्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जखमी असुन खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
फिर्यादी अमोल काकासाहेब माने (वय ३०)धोत्री ता जामखेड यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मी उसतोड मजुरी करून उपजिवीका भागवतो. तीन वर्षापूर्वी बबन बामदळे रा.लोणी ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचे ककुल भी ऊस तोडणीची 2,00,000/- रुपये उचल घेतली होती. ऊस तोडणी करून मी त्यावेळेस 1,00,000/- रुपये फोडले होते व 1,00,000/- रूपये देणे बाकी होते. त्यामुळे तो मला नेहमी त्याचे रक्कमेची मागणी करत होता.
दि. 24/07/2025 रोजी सकाळी 09/30 वाजणेचे सुमारास मी घरी असताना मला मुकादम बबन बामदळे रा. लोणी ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचा फोन आला व तु सावरगाव फाट्यावर ये असे सांगीतले. तेव्हा मी माझे घरून सावरगाव फाट्यावर आलो असता तेथे बबन बामदाळे हा त्याची बलोरो गाडी घेवून उभा होता तसेच त्याचे सोबत अनोळखी तीन लोक होते, तेव्हा बबन बामदाळे यानी मला शिवीगाळ करून त्यांचे पैशाची मागणी केली. तेव्हा मी तुम्हास नंतर पैसे देईल असे सांगत असताना त्यांनी लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरवात केली. व त्याचे बोलोरो गाडीत बसण्यास सांगीतले तेव्हा मी त्यांचे गाडीत बसलो असता त्यांनी गाडी लोणी ता. जामखेड जि. अहिल्यानगर येथे घेवुन जावुन तेथे त्या चार लोकानी लिंबाचे झाडाचे फोक मोडुन माझे पाठीवर, सीटवर पायावर हातावर मारहाण करून जखमी केले व तोडांवर चापटीने व बुक्क्याने मारहान केली. तु पैसे दिले नाहीतर जिव मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर मित्र दिपक रंजित भवर यास मी फोन लावून लोणी येथे बोलावुन घेतले. तेथे दिपक भवर यांने माझे कडे असलेली रक्कम परत देण्याची हमी दिल्यावर मी मित्र दिपक भवर याचे चारचाकी वाहनातून जामखेड येथे आलो. त्यानंतर मी व माझी पत्नी सोनाली पोलीस स्टेशनला फिर्याद देणे करीता आलो असता तेथुन मला औषध उपचारा करीता ग्रामीण रूग्णालय जामखेड येथे पाठवले. तेथे प्राथमिक औषध उपचार केले आहे. अमोल काकासाहेब माने यांच्या फिर्यादीवरून मुकादम बबन बामदाळे रा लोणी ता जामखेड यांच्यासह अनोळखी तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा