जामखेड प्रतिनिधी /30 जुलै2025
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत नुकतेच जारी करण्यात आलेल्या बदल्यांच्या आदेशानुसार,जि. अहिल्यानगर (ता. जामखेड,) येथील तहसीलदार गणेश माळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे करण्यात आली आहे.
या आदेशानुसार, गणेश माळी यांची बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली असून त्यांनी तत्काळ नवीन पदस्थापनेवर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या आत नवीन ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची अनुपस्थिती ही "अकारक्षमता" (dies non) म्हणून नोंदवली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
सदर बदल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ नुसार करण्यात आल्या आहेत. तहसीलदार माळी यांच्या कार्यकाळात जामखेड येथे अनेक शासकीय उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले. त्यांच्या बदलीमुळे तालुक्यातील प्रशासनात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा