जामखेड प्रतिनधी/29 जुलै2025
जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथे अवैध तिरट पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळण्याच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. दि.२८ जुलै २०२५ रोजी या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून १,५९,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध जुगारविरुद्ध कामाला लागले होते. गुप्त माहितीवर आधारित जामखेडमधील तपनेश्वर गल्ली येथे छापा टाकल्यावर ९ जण तिरट नावाच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना अडकले. याप्रकरणी नितीन आश्रुबा रोखडे (रा. आष्टा), जावेद इस्माईल बागवान (रा. तपनेश्वर रोड), संतोष नवनाथ कदम (रा. कुसडगांव), नवनाथ सदाशिव जाधव (रा. तपनेश्वर गल्ली), विजय विनायक कळसकर (रा. तपनेश्वर रोड), निलेश लक्ष्मण पेचे (रा. पोकळेवस्ती), जयसिंग विश्वनाथ डोके (रा. भुतवडा), विठ्ठल मोहन भोसले (रा. तपनेश्वर गल्ली), विजय गहिनीनाथ जाधव (रा. कर्जत रोड) या आरोपींची नावे नोंद झाली आहेत.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात तिरट पत्त्यांवर लावलेले पैसे आणि जुगार खेळण्याचा साहित्यातील वस्तू समाविष्ट आहेत. सदर गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी आहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमानाथ घार्गी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हृदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा