छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते.तसेच इंजिनिअरिंग क्षेत्र हे आत्मविश्वास व प्रमाणिक प्रयत्नांचे आहे
असे प्रतिपादन प्राचार्य विकी घायतडक यांनी केले.शहरातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड डिप्लोमा पाॅलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेली शिवकालीन तोफ वाजवून मान्यवरांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विकी घायतडक हे होते तर प्रमुख पाहुणे दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार होते.पुढे बोलताना प्राचार्य विकी घायतडक यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख आणि विविध पैलूंचे महत्त्व त्यांच्या व्याख्यानातून समजावून दिले. यावेळी दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार, पाॅलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज चे प्रा. किशोर हुंबे,प्रा.जयसिंग पवार,प्रा.दुलारी परदेशी,प्रा.राहिल शेख,अधिक्षक संतोष डहाळे, लिपिक संतोष जगताप यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी वरिष्ठ लिपिक सविता सुतार,प्रा.स्नेहल भोगे,प्रा.शुभदा भोज ,प्रा.पूनम कांबळे,प्रा.आश्विनी पोटफोडे,प्रा.माधुरी म्हेत्रे, तुषार बोथरा,सौरभ पवार आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जयसिंग पवार व सूत्रसंचालन सुरज रेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.राहिल शेख यांनी मानले.
No comments:
Post a Comment