हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज दि. १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात साजरा होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भगवेमय वातावरण तयार झाले आहे. याचा अनुषंगाने जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बसस्थानक येथे सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी व ग्रामस्थ , पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती-धर्माचे मावळे होते त्या माध्यमातून महाराजांनी अठरापगड जातींचा सन्मानच केला त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही चालले पाहिजे. असे मत व्यक्त करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.व महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण जगाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी सभापती रवींद्र सुरवसे, पत्रकार संतोष थोरात, श्वेता गायकवाड, धनसिंग साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल वामन थोरात, शशीकांत म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, श्रीकांत लोखंडे, दीपक जावळे, सोपान गोपाळघरे, मदन पाटील, गणेश शिंदे, आसाराम गोपाळघरे,महालिंग कोरे, अक्षय सुर्वे, बबलू सुरवसे ,गणेश ढगे, सचिन वडे, मोठया संख्येने युवक ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment