पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१८ फेब्रुवारी२०२५
जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत भर दिवसाच घराचे कुलूप तोडून घरातील दागिने व रोख रक्कम 40 हजार रुपये चोरून चोरटा फरार झाल्याची घटना जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील डोणगाव शिवारात रहात असलेल्या फिर्यादी द्वारकाबाई बाबासाहेब वाघमारे वय (६०) वर्ष धंदा शेती,राहणार डोनगाव ता.जामखेड. यांनी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 च्या सुमारास डोणगाव राहत्या घरी घराचे कुलूप उघडून कोणतीतरी अज्ञात चोरट्याने 70,500/ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 40,000/ रोख रक्कम अज्ञात चोरटा घेऊन फरार झाला आहे. या घटनेबाबत फिर्यादी द्वारकाबाई बाबासाहेब वाघमारे रा. डोणगाव यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दि 16 फेब्रुवारी 2025 रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment