पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/18फेब्रुवारी2025
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी दिघोळ फाटा मोहरी या ठिकाणी 6,75000/रु किं. ओ O2 पॉवर सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कॉपर केबल तांब्याची केबल अंदाजे 27 हजार मीटर वायर अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास जबरी चोरी केली आहे .
याबाबत फिर्यादी दत्ता रामा बारगजे वय (32 )वर्ष धंदा सिक्युरिटी गार्ड, राहणार नागोबाचिवाडी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दि 18 फेब्रुवारी 2025 रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला जबरी चोरी केल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी घडली असून 6,75000 रूपये किंमतीची ओ 2 पॉवर डिसी केबल 27 हजार मीटर तांब्याची तार असलेले केबलचे 27 ड्रम रोल पिकप गाडीमध्ये टाकून चोरटे घेऊन फरार झाले आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी भेट दिली असून .सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करत आहेत.
No comments:
Post a Comment