आज दिनांक १९/०२/२०२५ रोजी खर्डा येथे ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. मनीषाताई राळेभात आपले मनोगत मांडताना म्हणाल्या की, ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार पेरणारी संस्था आहे. मला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावसे वाटते की,मी अनेक वेळा पाहिले आहे की,गरिब, वंचित लोकांना मदत करताना संस्था या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे असते.आम्ही ज्याही वेळी लोकांना मदत करतो त्यावेळी संस्था या लोकांच्या सोबत असते यांचा आम्हाला अभिमान आहे. तसेच कोरो इंडिया या संस्थेच्या जी. एल. ओ. डी. पी. कार्यक्रमाच्या उ. महाराष्ट्र प्रमुख सोनम धिवर या पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. आपले मनोगता मध्ये त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीला महत्व न देता माणसाला महत्त्व दिले म्हणूनच आपले संविधान समता,न्याय, बंधुता सारखी मूल्य आली. तसेच डॉ. बीपीनचंद्र लाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपलं कुळदैवत आहे. आपण त्याचे विचार आचरणात आणले पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे.यावेळी नीता इंगळे,मीना शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच रागिनी कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गायला. कार्यक्रमाची प्रस्तावना मंगल शिंगाने यांनी केली तर प्रास्ताविका विशाल पवार यांनी मांडली कार्यक्रमाचे आभार उर्मिला कवडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आशा सेविका टेकाळे सविता, अंकुश,रेखा खटावकर, सविता खरात, मोहम्मद मदारी, मोहम्मद सय्यद, फकीर मदारी, फकीर सरदार मदारी,प्रमिला मोरे, अर्चना जावळे, सुरेखा कांबळे, रेखा कांबळे, सुरेखा जावळे, सुनिता कांबळे,भीमराव सुरवसे,प्रमिला जाधव,रुकसाना मापाडी आदीसर्व जाती धर्मातील लोक उपस्थित होते.
Wednesday, February 19, 2025
खर्डा :भटके विमुक्त संसाधन केंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
No comments:
Post a Comment