परांडा प्रतिनिधी/20 फेब्रुवारी2025
परंडा, धाराशिवः परंडा शहर आणि तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या ड्रग्स माफियांच्या वाढत्या सक्रियतेविरुद्ध माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदन देत परंडा तालुक्यात वाढणाऱ्या अमली पदार्थ तस्करीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, परंडा तालुक्यात मागील काही दिवसांत एमडी ड्रग्स आणि तत्सम अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री आणि तस्करी सुरू झाली आहे. यामध्ये काही संगठित टोळ्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळत असून, या टोळ्यांमार्फत तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत लोटण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माजी आमदर राहुल मोटे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, "जर योग्य वेळी पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही, तर परंडा तालुक्यातील तरुणांचे भविष्य अंधारमय होईल. त्यामुळे पोलिसांनी वेळीच कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे." तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करावी , तसेच राहुल मोटे यांनी मागणी केली आहे की,परंडा शहर आणि तालुक्यातील संशयित ठिकाणी विशेष छापासत्र राबवावे ,ड्रग्स तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी,स्थानिक पोलिसांनी सतर्क राहून गुप्तचर यंत्रणा अधिक मजबूत करावी तसेच धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक या निवेदनाची दखल कधी घेणार? आणि पुढील कारवाई कधी होणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment