पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/20 फेब्रुवारी2025
जामखेड तालुक्यातील जवळके गावात येथे दुर्दैवी घटना घडली होती, ज्यामध्ये 14 वर्षीय वयाच्या अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती शारीरिक संभंध प्रस्थापित करण्याचा गुन्हा दाखल खर्डा पोलीस स्टेशनला करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर (वय 23 वर्षे) रा जवळके ता .जामखेड याला मा. विशेष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 11 मार्च 2024 रोजी जवळके गावात 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती शारीरिक संभंध प्रस्थापित करण्याची घटना घडली होती या प्रकरणात आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर याच्या विरुद्ध खर्डा पोलीस स्टेशन गुरंनं. 53/2024 भा.दं.वि. कलम 376 (2)(आय)(जे)(एन) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रति अधिनियम कलम 4, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केला आहे. सरकारी वकील म्हणून श्रीमती कापसे यांनी केस चालवली, तर मदतनीस म्हणून पो हवा संभाजी शेंडे आणि कोर्ट अंमलदार पो कॉ. नामदेव रोहकले यांनी कामकाज पाहिले मा. विशेष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या प्रकरणाचा निकाल देताना आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर यास जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा बाल लैंगिक अत्याचार प्रति अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अनुसार दिली गेली आहे.
No comments:
Post a Comment