खर्डा प्रतिनिधी : ३० आॅगस्ट
उद्या पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि .३० ऑगस्ट रोजी ६ वाजे दरम्यान खर्डा शहरात रूट मार्च काढण्यात आला.
यावर्षी खर्डा पोलीस स्टेशनच्या स्थापनेनंतर प्रथमच गणेश उत्सव होत आहे. या पार्श्वभूमीवर खर्डा येथे कोणतीही अनुचित किंवा कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांच्या वतीने शिंपीगल्ली ते सुर्वे गल्ली पर्यंत रूट मार्च काढण्यात आला.
या रुट मार्चसाठी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, हवलदार सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, वैजीनाथ मिसाळ , बिराजदार,रफिक तांबोळी, बडे, भोगाडे, आवारे, , हंबर्डे, बडे, असे १ अधिकारी, १० कर्मचारी, ९ होमगार्ड होते.
No comments:
Post a Comment