जामखेड प्रतिनिधी : १ आॅक्टोबर
दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला असून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा समारोप प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी सदर कार्यक्रमासाठी कर्जत जामखेड प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक शेळके, ल.ना. होशिंगचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर्व अधिकारी कर्मचारी तसेच अनेक मान्यवरांसह अंगणवाडी सेविका, पालक, किशोरवयीन मुली व छोटी बालके उपस्थित होती.
दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा महिना, राष्ट्रीय पोषण महिना, म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा समारोप दि. ३० सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला. यावेळी किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व एचबी तपासणी करण्यात आली. तब्बल १२५ मुलींची तपासणी या दिवशी करण्यात आली .तसेच प्रत्येक अंगणवाडीमध्ये स्वस्थ बालक बालिका स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामधील तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
तालुक्यातील कुपोषित मुलांच्या आहारासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी यासाठी पोषण तुला कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पंचायत समिती अधिकारी ,कर्मचारी सर्व विभागाचे अधिकारी ,कर्मचारी तसेच इच्छुक व दानशूर पालक यांनी आपल्या मुलांची पोषण तुला करून तेवढ्या प्रमाणात पौष्टिक आहार अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी दान केला. यामध्ये एकूण ७० किलो शेंगदाणे ७० किलो गूळ ५० किलो सफरचंद ७० डझन केळी, ८ किलो फुटाणे, ५ किलो डाळी, विविध कडधान्य, काजू, बदाम, खजूर, राजगिरा लाडू, भरडा असे विविध पदार्थ लोकसभागातून प्राप्त झाले. सदर पदार्थ सॅम श्रेणीतील कुपोषित बालकांना दररोज अंगणवाडी केंद्रात खाऊ घालून त्यांची वजन वाढ होऊन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत.
No comments:
Post a Comment