जामखेड प्रतिनिधी : १९ सप्टेंबर
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशासाठी करत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. ते अनेक योजना राबवत आहेत. देशातील दिन, दलित, वंचित, महिला, युवक, शेतकरी, अपंग या सर्वांना त्याचा लाभ मिळत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हेखऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे सरकार आहे. लोकांच्या असणाऱ्या आशा आकांशा पूर्ण केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आदरणीय मोदी साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असा अशय असलेले २०० पोस्ट कार्ड जामखेड भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले आहेत.
यावेळी भाजपचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवि सूरवसे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस उदयसिंह पवार, उपाध्यक्ष गणेश लटके, तात्याराम पोकळे, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपळघरे, बोर्ला सोसायटीचे चेअरमन जालिंदर चव्हाण, नान्नज गण प्रमुख तुकाराम कुमटकर, रमेश ढगे, स्वप्नील मोरे, वैभव कार्ले, राम भोसले, महेश मासाळ, डॉ. प्रकाश राऊत , जनक सावंत, गोरख घनवट, दत्ता गिरी, अर्जुन जाधव, धनंजय कारंडे, अजय सातव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा