जामखेड प्रतिनिधी : ४ आॅक्टोबर
जामखेड बसस्थानकासमोरील दि. १ जुलै ते ३१ जुलै २०२२
दरम्यान जेमिनी सोयाबीन, जेमिनी सूर्यफूल, दीपसन सोयाबीन, पामोलीन अशा खाद्यतेलाच्या कंपनीचे ७७ तेलाचे डब्यांचा
अपहार झाले बाबत किराणा दुकानचे मालक वसंत नंदकिशोर तोडकरी राहणार खाडे नगर जामखेड यांनी दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 369/ 2022 भा. द. वि. कलम 408 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला होता .
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत होते तपास करत असताना यातील आरोपी लहू बाजीराव सांगळे रा. करेवाडी, ता. आष्टी, अलीम उर्फ आलम दादा शेख रा. नान्नज व सुरेश भगवान गंभीरे रा. सरदवाडी, ता. जामखेड यांचा शोध घेऊन कसोशीने तपास करून त्यांच्याकडून
गुन्हात नोंद असलेला १ लाख ६९ हजार २७५ रुपये किमतीचा मुद्देमाल यात जेमिनी सोयाबीन, जेमिनी सूर्यफूल, दीपसन सोयाबीन, पामोलीन अशा खाद्यतेलाच्या कंपनीचे ७७ तेलाचे डबे तपासा दरम्यान हस्तगत केलेले होते. सदरचे तेलाचे डबे आज दि. ४ आॅक्टोबर रोजी माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे फिर्यादी वसंत नंदकिशोर तोडकरी यांना परत करण्यात आलेले आहेत.
हा गुन्हा दुकानातील कामगारानेच ईतर आरोपींना हाताशी धरून केले होते. त्यामुळे कुंपनच शेत खात होते असे म्हणावे लागेल.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सो अहमदनगर ,अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर ,पोलीस उपअधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सो ,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात,पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे ,पोलीस नाईक अविनाश ढेरे ,पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी, विजय सुपेकर, अरुण पवार यांनी केली आहे.
या कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment