जामखेड प्रतिनिधी : ४ आॅक्टोबर
जामखेड शहरात दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास या घटनेतील फिर्यादी अतुल बंडू जगातप हे त्यांचे दुकान समर्थ मेन्स वेअर हे बंद करुन जात असताना आपल्या मोटारसायकलची चावी दुकानात विसरली म्हणुन परत दुकानात जाण्यासाठी म्हणुन त्यांच्याकडे असलेली पिशवी ज्यात त्यांनी लोनवर खरेदी केलेले ४ मोबाईल हँन्डसेट होते. ती पिशवी मोटारसायकलच्या हँङलला गुतवुन ठेवली व त्यांच्या ओळखीचे असलेले मित्र यांना पिशवीवर लक्ष ठेवायचे सांगुन, फिर्यादी जगताप हे मोटारसायकलची चावी आणण्यासाठी दुकानात
गेले. मात्र चावी घेवुन परत दुकानासमोर असलेल्या ठिकाणी आले असता. ओळखीचे असलेले मित्र यांनी फिर्यादी यांच्या अविश्वासाने ४ मोबाईल हँन्डसेट असलेली पिशवी घेवुन फरार झाले होते. त्यावरुन फिर्यादी अतुल बंडू जगातप यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने गु.र.नं. 420/2022 भादवि कलम 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक जामखेड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक संग्राम जाधव व पोलीस काॅन्स्टेबल पवार, राउत हे करीत होते. दरम्यान गुन्हयाचा तपास करीत असताना यातील आरोपी महादेव उर्फ माणिक हरीदास फुंदे रा. कांदेवाङी ता.धारुर जि. बीड योगी बाळासाहेब जाधव रा. बुंदेलपुरा ता. जि. बीङ यांना सापळा रचुन अटक करुन गुन्ह्यात चोरी गेलेले २ विवो कंपनीचे X80 मोबाईल व एक महागङा आयफोन कंपनीचा मोबाईल हँन्ङसेट असा एकुण १,६२००० रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाङ यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस पोलीस हेडकॉन्टेबल लोखंडे, काॅन्स्टेबल राठोङ तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक संग्राम जाधव, पोलीस काॅन्स्टेबल पवार, राउत, आजबे यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक संग्राम जाधव करीत आहेत.
No comments:
Post a Comment