खर्डा प्रतिनधी:३ डिसेंबर
रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या विद्यालयात स्थानिक स्कूल कमिटीवर नियुक्त केलेल्या श्रीमती जयश्रीताई गोलेकर, श्री किशोर शेठ कांकरिया, श्री अशोक गीते या सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सन २०२२ ते २०२५ या कार्यकाळासाठी या मान्यवरांची खर्डा इंग्लिश स्कूलच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ उगले हे होते. तसेच श्रीमती जयश्रीताई गोलेकर, श्री किशोर शेठ कांकरिया, श्री अशोक गीते यांना सदस्यपदी नियुक्ती केल्याचे पत्रही उगले यांनीच दिले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण कुंभार सर्व सदस्य तसेच खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे,यचंदू गोलेकर, विजयसिंह गोलेकर, राजेंद्र गोलेकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार किशोर दुशी, खर्डा व परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक मुक्तेश्वर फामदे यांनी तर आभार प्राध्यापक विधाते यांनी मानले.
श्रीमती जयश्रीताई गोलेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, कष्ट ही त्रिसूत्री चे महत्व सांगितले आणि विद्यालयाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही दिली. यावेळी तिन्ही नवनिर्वाचित सदस्यांचा
यथोचित सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल नवनियुक्त सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment