खर्डा प्रतिनिधी : २ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अमृतलींग वस्ती, खर्डा येथील एका जणास कोणत्यातरी महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय घेत पाच जणांनी त्यांचे घरी जाऊन काठी व लाथांनी जबर मारहाण केल्याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील अमृतलींग वस्ती, खर्डा येथील फिर्यादी बापू गोरख सुर्वे यांचे घराचे समोर दि. १ डिसेंबर रोजी रात्री ७ : ०० वाजताचे सुमारास यातील आरोपी अशोक दत्तू भाकरे, नितीन दत्तू भाकरे, दत्तू भीमा भाकरे ( रा. गिरलगाव ता. भुम), कृष्णा बाळू बराटे (ज्योतिबाचीवाडी ता भूम), मच्छिंद्र बापू सुर्वे (खर्डा ता जामखेड) यांनी फिर्यादी बापू गोरख सुर्वे (वय ४५) यांचे कुठल्यातरी बाईसोबत अनैतिक संबंध असावा असा संशय घेऊन बापू गोरख सुर्वे हे त्यांच्या घरासमोर बसले असताना आरोपीनींनी लाकडी काठी व लाथांनी फिर्यादीच्या पाठीवर पायावर मानेवर मारहाण केली तसेच काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर मनगटाच्या मागे जोरात मारून हाताला गंभीर दुखापत केली. यानुसार बापू गोरख सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक दत्तू भाकरे, नितीन दत्तू भाकरे, दत्तू भीमा भाकरे रा. गिरलगाव ता. भुम, कृष्णा बाळू बराटे ज्योतिबाचीवाडी ता. भूम, मच्छिंद्र बापू सुर्वे खर्डा ता. जामखेड यांचे विरोधात भा.द.वि कलम 143,147,149, 326, 323, 504, 506 प्रमाणे खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे हे पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment