जामखेड प्रतिनिधी : २ डिसेंबर
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी जामखेड नळपाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण योजनेचा मंजूरीचा जीआर
शालेय शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री ना.रवींद्र चव्हाण आमदार प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविंद्र सुरवसे , नगरसेवक बिभीषण धनवडे, सुपूर्द केला आहे. या कामाचे १७९. ९८ लक्ष रुपये किंमतीचे मंजुरीचे पत्र मिळाल्याने आता लवकरच जामखेड शहर व नगर परिषद हद्दीतील वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. यामुळे जामखेड शहरातील जनतेतून या निर्णयाचे मोठे स्वागत होत आहे.
मुंबई येथे गुरूवारी दि.१डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हे पत्र देण्यात आले. यावेळी जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी,
माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक बिभीषण (मामा)धनवडे, नगरसेवक गणेश काका आजबे, नगरसेवक शाकीर खान, नगरसेवक संदीप गायकवाड, विधी व न्याय जि.अध्यक्ष ऍड. प्रवीण सानप, जि.प.सदस्य सोमनाथ पाचारने, डाॅ अलताब शेख, प्रा. आण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट आदिंसह जामखेड भाजपा पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment