पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ४ आॅगस्ट
जामखेड येथे नागपंचमी निमित्त होणाऱ्या यात्रेचे सुरक्षा व इतर व्यवस्थांचे नियोजन करण्याच्या हेतूने जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने अनेक मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या. यामध्ये आनंद मेळा, पालखी मार्ग, नर्तीकांचे डाव, व कुस्ती आखाडा याचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आज दि. ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११:३० ते १ :०० वाजताचे दरम्यान जामखेड येथिल तहसील कार्यालय येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर प्रशासकीय शांतता कमिटी सदस्य राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सभापती शरद कार्ले, संजय कोठारी, मुख्याधिकारी अजय साळवे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे जामखेड तालुकाध्यक्ष पांडूरंग भोसले ,सनी सदाफुले, विकी सदाफुले, विकी घाययडक, बबन काशीद, तसेच बाजार समिती सचिव वाहेद सय्यद, संजय काशीद, संपत राळेभात, अभिजीत राळेभात, प्रवीण उगले, निखिल घायतडक, विकास राळेभात, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, इतर सदस्य यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आगामी दिनांक २१ आॅगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या नागपंचमीच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना
१) आनंद मेळाव्याकरिता जागा निश्चित करणे.
२) पालखी मार्गावर येणारे समस्या
३) आनंद मेळा, नर्तिका डाव याठिकाणी आपले स्वयसेवक नेमावे.
४) नर्तिका डाव संदर्भात योग्य ते नियोजन करावे त्याठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावावे.
५) आनंद मेळाव्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व रस्त्याच्या कडेला असणारे व्यापारी यांनी आपल्या दुकानासमोरील एक कॅमेरा रोड कव्हर होईल असा बसवणे.
६) आनंद मेळा ठिकाणी वाहन पार्किंग याची व्यवस्था करणे.
७) आनंदमेळावा ठिकाणी वॉटर प्रूफ पोलीस मदत केंद्र उभारावे. त्या मदत केंद्रात सर्व सी सी टी व्ही चे चित्रीकरण पोलीसाना पाहता येईल असे लावावे.
८) डोळ्याची साथ सध्या चालू आहे त्या बाबत आरोग्य विभाग यांनी योग्य नियोजन करणे.
९) कुस्ती आखाडा या ठिकाणच्या पार्किंग व्यवस्था व्यवस्थित ठेवावी.
१०) गुंड प्रवृत्तीचे लोक आनंद मेळावा मध्ये बाधा उपलब्ध करणार नाहीत या बाबत योग्य ते नियोजन करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी.
११) शहरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट चालू करून कोठेही अंधार राहणार नाही तसेच लाईट जाणार नाही या बाबत योग्य नियोजन करावे.
१२) आनंद मेळाव्याच्या ठिकाणी ॲम्बुलन्स व अग्निशामक दलाचे गाडीचे व्यवस्थापन करणे.
१३) आनंद मेळावा ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे.
१४) आनंद मेळावा ठिकाणी पाळण्याचे दर निश्चित करावे.
१५) मार्केट कमिटी जामखेड यांनी जागेचा निलाव लवकर करून घेणे.
यावरील सर्व विषयावर प्रशासकीय अधिकारी व शांतता कमिटी सदस्य यांची साधक बाधक चर्चा झाली आहे.
शांतता कमिटी मीटिंग करीता ४५ सदस्य उपस्थित होते. मिटिंग शांततेत संपली आहे.
No comments:
Post a Comment