पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २७ सप्टेंबर
जामखेड तालूक्यातील खर्डा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटका विक्री करणाऱ्या गोळी सेंटरवर छापा टाकून
वेगवेगळ्या कंपन्यांचा २१४७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांवर गुन्हा दाखल करत एका आरोपीस अटक केली असून एक जण फरारी झाला आहे. गुटका बंदी असतानाही इतके प्रमाणात गूटका विक्री होत असल्याने हा गुटका येतो कुठून याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सविस्तर असे की, खर्डा शहरातील चॉदणी चौकातील बरकत गोळी सेंटर या दुकानात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ व विविध कंपनिचा पानमसाला गुटखा याचा साठा करून तो त्याची विक्री असल्याची माहिती मिळाल्याने अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी काल दि. २६ सप्टेंबर रोजी ३:४५ मिनिटांच्या सुमारास छापा मारून केलेल्या कारवाईत गोवा 1000 गुटखा कंपनीचे १०,००० रुपये किमतीचे ५४ पुडे, राजनिवास पान मसाला कंपनीचे ४२२४ रुपये किमतीचे २२ पुडे, आरएमडी सेंटेड टोबॅको कंपनीचे २१६० रुपये किमतीचे ६ पुडे, विमल पान मसाला कंपनीचे ७९२ रूपये किमतीचे ४ पुडे, ८८ रूपये किमतीचे व्ही तंबाखूचा १ पुडा, ७६८ रूपये किमतीचे प्रिमीयम जेड एल १ जाफरानी जर्दा तंबाखु १६ पुडे २०४० रूपये किमतीचे हिरा पानमसाला कंपनीचे १७ पुडे, ६०० रूपये किमतीचे रॉयल ७१७ तंबाखुचे २० पुडे असा एकूण २१४७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस काॅन्स्टेबल रोहित मधुकर मिसाळ (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. व कलम - 178/2023 भा.द.वी कलम 328,188,272,273,34 प्रमाणे
दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी सद्दम सिराज तांबोळी (वय ३०) अटक करण्यात आला आहे. तर बबलु उर्फ प्रशांत रेवणनाथ शिंदे रा. चौसाळा हा आरोपी फरार झाला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.
चौकट
दुसर्या एका छाप्यात अतुल एजन्सी ह्या दुकानावर टाकलेल्या छाप्यात अनिल पांडुरंग लोंढे व अशोक बबन तोंडे या दोघांवर गुन्हा दाखल करून एकुण १०९७४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जणास अटक करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment