पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ ऑक्टोबर
कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री कुकडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्याची पुन्हा एकदा शक्यता निर्माण झाली आहे.
त्या अनुषंगाने आ. राम शिंदे यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोनद्वारे संपर्क साधून विसापूर व सीना धरणात पाणी सोडण्याची विनंती करताच ना. पाटील यांनी या सर्व गोष्टी ऑनलाईन असल्याचे सांगत तत्काळ कार्यवाहीचे आदेश देवून रात्रीतून पाणी सोडण्याची कार्यवाही पूर्ण करतो, असे आश्वासन दिले.
आणि लगेच रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुकडी डाव्या कालव्यातून येडगाव येथून पाणी सोडण्यात आले, त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कर्जत तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती आ. शिंदे यांनी ना. पाटील यांना करताच रविवारी पहाटे पाच वाजता पाणी सोडण्यात आले.
हे सोडण्यात आलेले पाणी लवकरच भोसा खिंडीद्वारे सीना धरणात येणार आहे. पाणी सुटल्याने आता सीना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होणार असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर यामुळे यंदादेखील सीना धरण पूर्णक्षमतेने भरून वाहील, याबाबत येथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाणी प्रश्नाचे श्रेय घेण्याचा कोणीही केविलवाणा प्रयत्न करू नये. राज्यात तीन वर्षे सत्ता असताना काही झाले नाही. याबाबत जनतेला सगळे काही समजते. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोनवरून मी केलेली विनंती त्यांनी मान्य करून लगेच कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्याने या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो - आ. प्रा. राम शिंदे
No comments:
Post a Comment