पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- २ ऑक्टोबर
दिनांक=28/09/2023 वार-गुरुवार रोजी जामखेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली-सदिच्छा मंडळ त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सदर कार्यकारणीमध्ये आदर्श व उमदे नेतृत्व गुण असणाऱ्या खर्डा परिसरामधील शिक्षकांना मानाचे पद मिळाले आहेत
तसेच यानिमित्ताने दि ३० सप्टेंबर रोजी खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे व युवा कार्यकर्ते प्रमोद गोलेकर यांनी शिक्षकांचे यथोचित सत्कार खर्डा येथे आयोजित केले होते .सर्व शिक्षक यांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .यावेळी खर्डा परिसरामधील शिक्षकांना मानाचे पद मिळालेमुळे या ठिकाणी त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा येथूचित सत्कार करण्यात आला
यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी खर्डा इंग्लिश स्कूल, शाळेचे पर्यवेक्षक पाटील सर तर प्रमुख पाहुणे म्हणून विधाते सर, पत्रकार श्वेता गायकवाड ,धनसिंग साळुंखे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.व यावेळी प्रमुख उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांना मिळालेली पदे
*राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.केशवतात्या गायकवाड साहेब.*
*श्री.शहाजी जगताप सर व श्री.श्रीहरी साबळे सर= गुरुमाऊली मंडळ जिल्हा कार्यकारणी प्रतिनिधी.*
*श्री.रुपेश वाणी सर= जामखेड तालुका पदवीधर व मुख्याध्यापक महासंघ अध्यक्ष.*
*श्री.बापूसाहेब कोळी सर= जामखेड तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कार्याध्यक्ष.*
*श्री.धीरज उदमले सर = जामखेड तालुका गुरुमाऊली-सदिच्छा मंडळ कार्याध्यक्ष.*
*श्री.निलेश बोराडे सर = जामखेड तालुका गुरुमाऊली-सदिच्छा मंडळ सरचिटणीस.*
*श्री.ज्ञानेश्वर कौले सर=जामखेड तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारी उपाध्यक्ष.*
*श्री.तानाजी सूर्यवंशी सर= जामखेड तालुका गुरुमाऊली-सदिच्छा मंडळ कोषाध्यक्ष.*
*श्री.नितीन पवार सर= महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तंत्रस्नेही कार्यकारिणी उपाध्यक्ष.*
*श्री.भाऊसाहेब डिडूळ सर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तंत्रस्नेही कार्यकारिणी सरचिटणीस*
खर्डा परिसरातील समस्त शिक्षक बांधव,पालक, शिक्षणप्रेमी यांच्यावतीने सदर कार्यकारणीमध्ये खर्डा परिसरातील शिक्षकांची मानाच्या पदांवर निवड केल्याने शिक्षक नेते बापूसाहेब तांबे , गुरुमाऊली मंडळ जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जामखेड तालुकाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावणारे तसेच जिल्हा कार्यकारणी मध्ये निवड झालेले एकनाथदादा चव्हाण सर, संचालक संतोषकुमार राऊत सर, विश्वस्त मुकुंदराज सातपुते यांचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment