आ. रोहित पवार यांनी घेतली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; कुकडी व सीना धरणाच्या आवर्तनाबाबत केली महत्त्वाची मागणी - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

Home राजकीय बातम्या आ. रोहित पवार यांनी घेतली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; कुकडी व सीना धरणाच्या आवर्तनाबाबत केली महत्त्वाची मागणी

आ. रोहित पवार यांनी घेतली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; कुकडी व सीना धरणाच्या आवर्तनाबाबत केली महत्त्वाची मागणी

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०२३ राजकीय बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१५ नोव्हेंबर

 कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कुकडी डाव्या कालव्यावरती मतदारसंघातील ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. कर्जत तालुक्यात कुकडी व सीना धरणाचे आवर्तन सोडले जात असते या आवर्तनातून उपलब्ध होत असलेल्या पाण्याचा येथील शेतकऱ्यांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात असून टँकर भरण्यासाठी देखील सध्या पाणी उपलब्ध नाही. याच अनुषंगाने कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी कुकडी व सीना धरणाचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाल्यास १५ डिसेंबरपासून कुकडीचे आवर्तन सोडण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. त्याचवेळी बैठकीत ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आवर्तन सोडले जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आता पाऊस झाला नसल्याने ठरल्याप्रमाणे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आवर्तन सोडले जावे याबाबत आमदार रोहित पवार यांनी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे.

सध्या पाण्याची मोठी गंभीर परिस्थिती मतदारसंघात शेतकरी व नागरिकांना भेडसावत असल्याने तातडीने कुकडी व सीना धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची आवश्यकता आहे हेच लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे आवर्तन सुटावे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपल्या स्तरावरून आग्रही मागणी व्हावी याबाबतची विनंती केली आहे. त्याचा फायदा हा जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा,कर्जत तसेच करमाळा या 4 तालुक्यातील गावांना देखील मोठ्या प्रमाणात होणार असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निवारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. 

याबरोबरच दुष्काळ परिस्थिती पाहता मतदारसंघात पाण्याची व चाऱ्याची देखील मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे याला अनुसरून कर्जत तालुक्यातील 74 गावे व जामखेड तालुक्यातील 75 गावे टंचाईग्रस्त असून पिण्याच्या पाण्याची व जनावरांसाठी चाऱ्यांची आवश्यकता त्या प्रमाणात निर्माण होणार आहे त्यामुळे टँकर व जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो सुरू करण्याची देखील विनंती यावेळी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. बरोबरच शासनाने अनुदानाद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली अनुदानाची रक्कम देखील अद्याप प्राप्त झालेली नाही ती प्रलंबित कांदा अनुदानाची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठीची मागणी देखील यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना व नागरिकांना योग्य वेळी पुरेसे पाणी मिळावे यासाठी मी कायमच प्रयत्नशील असतो. कुकडी व सिनाच्या आवर्तनाबाबतही मी वेळोवेळी भूमिका मांडत आलो आहे. त्यानुसारच आज नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेऊन अजित दादा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस न पडल्यास 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत कुकडी व सिनाचे आवर्तन सोडण्यात यावे अशी विनंती केली. तसेच शेतकऱ्यांना आहे तेवढे पाणी शेतीला वापरता यावे यासाठी पूर्ण दाबाने विज मिळावी, डीपी मिळावे तसेच माझ्या मतदारसंघातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांसाठी चारा डेपो सुरू करणे, प्रलंबित कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळणे, तातडीने पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याबाबत विनंती पालकमंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून केली. पालकमंत्री महोदयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मार्गी लावण्याचा शब्द दिला. 

- आमदार रोहित पवार
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at गुरुवार, नोव्हेंबर १६, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पदवीधर विधान परिषदेसाठी पदवीधर मतदारांनी शांततेत मतदान करावे - सपोनि. प्रकाश पाटील

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत मागील अनेक महिन्यांनपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *