पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-९ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगाव गाव येथील काल ग्रामपंचायत निवडणूक पार पडली असून सोनेगाव ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी डॉ .विशाल वायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ प्रा. सचिन सर गायवळ या बंधूंच्या मार्गदर्शन व सहकार्याने आज दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सोनेगावच्या सरपंचपदी डॉ .विशाल राजेंद्र वायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . यावेळी सर्व नऊ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवड जाहीर होताच सोनेगाव मध्ये गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष करण्यात आला.
यावेळी बोलताना सचिन सर गायवळ म्हणाले की, डॉ. विशाल वायकर यांची सरपंचपदी निवड ही सोनेगावच्या विकासासाठी व गावातील प्रत्येक व्यक्तीच्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी केलेली आहे. ते स्वतः डॉ. असल्याने त्यांचा ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे ते सोनेगावच्या विकास कामात नक्कीच भर घालतील असा मला ठाम विश्वास आहे व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच विशाल वायकर कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. यावेळी उपस्थित माजी सरपंच रुपाली बिरंगळ , ग्रामपंचायत सदस्य सुमन मिसाळ, रुक्मणी बिरंगळ, सुनीता बोलभट, मनीषा वायकर, विलास मिसाळ ,मारुती बोलबट, अश्रू खोटे सह सोनेगाव चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनेगाव चा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एस. एल .नवले ,तलाठी श्रीराम कुलकर्णी व ग्रामसेवक एस .एस .गदादे यांनी काम पाहिले आहे.
No comments:
Post a Comment