पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी परिस्थिती अतिशय बिकट आहे, पिके जळून नष्ट होत आहेत, पिण्याच्या पाण्याची टंचाई होईल, बेरोजगारी वाढत आहे म्हणून जामखेड तालुका दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शेतकरी स्वप्नील खाडे यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन निवेदनद्वारे मागणी केली
जामखेड तालुक्यामध्ये सन २०२३ पूर्णतः पाऊसकाळ हा कोरडा गेलेला असून तो पण थोडाफार पाऊस झाला त्यातच गतवर्षी अवकाळी पावसाचा फटकारा हा पावसाळी ऋतुमध्ये बसला. एक पिक कसेबसे कुठेकुठे आले. त्यानंतर दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी पासून काही दिवस काही ठिकाणी हलक्या सरी व काहि ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पण जामखेड तालुक्यातील लघु पाटबंधारे व विविध स्वरूपातील तलाव, नद्या, नाले यात कसल्याही प्रकारे पाणीपातळी वाढली नाही.
जामखेड शहरातून वाहणारी विंचरणा नदीला व भुतवडा तलावाला वरील बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातील पर्जन्य झाल्यामुळे पुरस्थिती पहायला मिळाली अन्यथा जामखेड तालुक्यातील एकाही नदीला पाणी नाही. पाऊसकाळ हा हलका झालेला आहे. जमिनीच्या मातीला व शेतकऱ्याच्या घशाला कोरड पडलेली आहे. ऐनदिवाळी उत्सव हा हालाकीचा चाललेला आहे. जामखेड शहरासह तालुक्यात कोठेही सन उत्सवाचे वातावरण दिसत नाही. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके कमी पर्जन्य झाल्यामुळे कोलमडत आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे सुद्धा संकट आहे. मुख्यतः शेती व्यवसायावर चालणारा तालुका दुष्काळाच्या सावटाखाली दबलेला आहे.
त्यामुळे शासनाने जामखेड तालुक्याचे नाव दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना दोन्ही पिकाचे नुकसान अनुदान व पिकविमा पंचनामे तसेच मदत तातडीने देण्यात यावे. न.रे.गा. व विविध शासनाच्या योजना लागू करून समस्त जामखेड तालुक्यावरील दुष्काळी संकट सावरण्यात यावे, व जामखेड तालुका दुष्काळ जाहिर करावा अन्यथा जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरीकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा