पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दिवाळीच्या मुहूर्तावर विविध प्रकारचे फाटाके खर्डेकरांसाठी अल्पदरात उपलब्ध आहेत . फटाका खरेदीसाठी खर्डा किल्ल्यासमोर फटकाचे मोठे मोठे दुकाने लावले असून खरेदिकरांनी परवडेल असे कमी किंमतीमध्ये व विविध प्रकारचे फाटाके येथे उपलब्ध आहेत .व किल्ला परिसरात शिवपट्टण असुसिएशनच्या वतीने हे प्रतिवर्षीप्रमाने याहीवर्षी फटाक्याचे सहा स्टॉलची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी सुरसुरी , भुईचक्र, पाऊस ,आपटे बॉम्ब, रॉकेट या पारंपारिक फटाक्यांसह बाजारात अनेक नवे फटाके आले आहेत .आकाशात उडणारे 'शॉट्स फटाक्या त ' विविध प्रकार आल्याचे याठिकाणी फटाकाचे व्यापार करणारे किरण जायभाय व राजेंद्र जाधवर यांनी सांगितले आहे. ते म्हणाले दरवर्षी बाजारात नवनवे प्रकारचे फटाके येत असतात यंदा आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमध्ये नवनवे प्रकार आले आहेत. उंच आकाशात दीर्घ प्रकाशमान राहणारे फटाके यंदाचे आकर्षण आहेत .लांबून हे फटाके दृष्टीस पडतील . तसेच बंदुकीच्या आकारात असलेल्या फटाक्याच्या वातीला जाळल्यास त्यातून रंगीत प्रकाश बाहेर पडतो हा प्रकार सुद्धा लहान मुलांच्या पसंतीस पडत असल्याचे खर्डा येथील फटाके व्यापारी किरण जायभाय व राजेंद्र जाधवर यांनी यावेळी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा