पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२७ जानेवारी
संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला यश मिळाल्याने जामखेड येथे मराठा समाजाच्या वतीने व मराठा समाजबांधवांन कडुन शहरातील खर्डा
येथे डीजेच्या तालात वाजत गाजत व गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला. याच अनुशंगाने खर्डा शहरात देखील फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, सह खर्डा परिसरातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
No comments:
Post a Comment