पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत ५१ शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक प्रतिकी ४ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहेत अशाच प्रकारे एकूण दोन कोटी चार लाख रुपये सोनेगावकरांसाठी वैयक्तिक विहिरीच्या अनुदानासाठी मंजूर झाले होते. सोनेगाव चे सरपंच डॉक्टर विशाल वायकर यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांसाठी विहरी अनुदानाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करून कागदपत्रांचा पाठपुरावा करून मंजूर करून आणले होते.
आज त्याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक २८ जानेवारी रोजी सोनेगाव येथील ५१ शेतकऱ्यांना विहिरीचे वाटप ग्रामपंचायत कार्यालय सोनेगाव येथे सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
त्यामुळे सोनेगाव येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी उपस्थित सोनेगाव चे सरपंच डॉ.विशाल वायकर , उपसरपंच लखन बबन मिसाळ, विलास संपत मिसाळ , आश्रू विनायक खोटे, हनुमंत रामदास वायकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment