पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ फेब्रुवारी
जामखेड येथील जामखेड नगरपरिषद येथील व्यापारी शेतकरी व संतप्त नागरिकांनी जामखेड नगर परिषद चे नवीन डीपी प्लॅन प्रारूप
जामखेड नगरपरिषद महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 26 11 अन्वे य जामखेड शहराचे प्रारूप विकास योजनेची प्रसिद्धीकरण या योजनेची हरकत देत असलेल्या बाबतचे निवेदन कार्यालय अधीक्षक संभाजी कोकाटे यांना देण्यात आले सदर निवेदनात सदरचा आराखडा हा प्रशासकीय कार्यकाळात तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच आराखडा तयार करताना समाजातील कोणतेही जबाबदार व्यक्तींना विश्वासात घेतले गेले नसल्याचे सदरच्या डीपी प्लॅन जामखेडकरांना मान्य नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी बीड रोडवरील 30 मीटर रस्ते मध्ये अनेक घरे तुटत आहेत मग त्याच रोडवर 45 मीटर रस्ता शहरात कशासाठी एवढी मोठी डोळझाक कोणाच्या सांगण्यावरून केली आहे तसेच विकास आराखड्याचे प्रसिद्धी करून एक महिना होत आला आहे तरी देखील 90 टक्के लोकांना अजूनही माहिती नाही की आपले घरे दुकान जात आहेत त्यामुळे विकास आराखड्याचा मोठा बोर्ड बनवून दर्शनी भागात लावणे गरजेचे होते असे अनेक प्रश्न उपस्थित केली आहे गोरगरीब जनतेचे नुकसान होऊन ते रस्त्यावरील येत असतील तर ही जनता गप्प बसणार नाही त्यावेळी जामखेड वकील संघाचे अध्यक्ष ऍड शमा हा जी कादर शेख यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करून नवीन आराखड्याची एका नकाशाची किंमत सहा हजार आठशे रुपये असून असे सात भागातील नकाशे घ्यावयाचे असल्यास पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होणार आहे असल्याची बाब नगरपरिषद ने पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जनतेत फार आक्रोश निर्माण झालेला आहे त्याचबरोबर मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष माननीय अजहर काजी यांनी देखील डीपी प्लॅन दुरुस्त करून पुन्हा नव्याने करण्यात यावे असे सांगितले सदर निवेदनावर प्राध्यापक मधुकर आबा राळेभात तसेच मुस्लिम पंच कमिटी जामखेड अध्यक्ष अजहर भाई, उपाध्यक्ष सय्यद मंजूर अली, अमीर तसेच जामखेड वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट शेख शमा हाजी कादर, मुक्तार सय्यद ,शरद शिंगवी ,पितळे मामा हाजी ,हजू सुभेदार ,जावेद बारूद ,सय्यद , शिवाजी डोंगरे ,एडवोकेट जे. एम .सय्यद, ऍड शेख ए ए ,ऍड घुमरे त्याच बरोबर इतर वकील सदस्यां सह जामखेड नागरिकांचे जवळपास दीडशे ते दोनशे सहा चे निवेदन दिलेली आहे त्यावेळी नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक कोकाटे यांनी सदरचे निवेदन स्वीकारले
No comments:
Post a Comment