पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/12 मे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत देशाला विकासात पुढे आणले आहे. यामुळे डॉ. सुजय विखे यांना मत म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत. नगर जिल्हा विविध कामांच्या माध्यमातून विकसित व दुष्काळमुक्त करण्याचे धोरण महायुती सरकारचे आहे. जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागाकरिता सुरू असलेले जल सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करूण देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी डॉ .सुजय विखे यांना भरघोस मतदान करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांनी केले आहे.
डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासाची भरघोस कामे केली आहेत. येणाऱ्या काळात सुजय विखेंच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा आहे. तसेच माजीमंत्री व आपले नेते आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जामखेड सह संपुर्ण नगर दक्षिण मतदार संघात होत असलेल्या प्रचारास मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच महायुतीत सहभागी असलेले भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच घटकपक्षांचे कार्यकर्ते या मतदारसंघात जोमाने कामाला लागले आहेत.
येत्या १३ तारखेला कमळ चिन्हाचे बटण दाबून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment