पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा जवळील बाळगव्हाण येथील पोल्ट्री व्यवसायातील युवा उद्योजक शुभम गोकुळ दाताळ वय २४ वर्षीय यांचा विजेचा मेन लाइनचा झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे वडील गोकुळ दाताळ हे या घटनेत जखमी झाले आहेत, या घटनेमुळे खर्डा व बाळगव्हाण परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
दि १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान ते आणि त्यांची वडील पोल्ट्री फार्मच्या शेड जवळील लाईटचा सप्लाय बंद असल्याने डीपी जवळील लाईनला डिओ टाकत असताना अचानकपणे त्यांच्या हातातील लोखंडी पाईप मेन लाईनला लागल्याने त्यांना मोठा जबर करंट बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या जवळ उभे असणारे त्यांच्या वडिलांना करंट बसून ते बाजूला फेकल्याने ते जखमी झाले आहेत.
शुभम दाताळ हे इलेक्ट्रिक इंजिनिअर ही पदवी घेऊन नोकरी न करता स्वतःचा पोल्ट्री उद्योग व्यवसायात चांगल्या पद्धतीने कष्ट करून त्यांनी भरारी घेतली होती, लोणी फाट्या जवळील त्यांच्या शेतात त्यांनी १४००० हजार बारामती ऍग्रो कंपनीच्या कोंबड्यांचे मोठे एसी शेड उभे केले होते. आधुनिक तंत्रज्ञानाने कोंबड्यांना खाद्य वाटप, पाणी देणे, स्वच्छता ठेवून त्यांनी व्यवसायात मोठी प्रगती करण्यास सुरुवात केली होती. दर महिन्याला शुभमला लाखो रुपयांचा नफा मिळत होता त्यांनी त्याच पद्धतीने दुसऱ्या शेडच्या उभारण्याचे काम हाती घेतले होते शुभम दाताळ यांचा स्वभाव शांत मनमिळावू व प्रेमळ होता आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे हा त्यांचा स्वभावाचा गुणधर्म होता ते अविवाहित होते.
शुभम दाताळ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खर्डा परिसरात नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.
त्यांच्या मागे आई-वडील, आज्जी, एक भाऊ असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment