पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/४ मे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मुलीचे वडील ज्ञानेश्वर हरिभाऊ काशीद यांनी पोलीस स्टेशनला खबर देऊन माहिती दिली की, दिनांक ४ मे २०२४ रोजी दुपारी 2 वाजता मी व माझी मुलगी असे आम्ही दोघेजण बारवात पोहत होतो. त्यानंतर मी कामानिमित्त गावात आलो.
परंतु मुलगी कु. सानिका ज्ञानेश्वर काशीद वय १० वर्षे ही ओंकारेश्वर मंदिरासमोरील पुरातन काळातील बारवात पुन्हा पोहत असताना ती वरती येऊन पोहण्यासाठी उडी मारताना तिचा दगडी पायऱ्याला शेवाळ असल्यामुळे पाय घसरून ती खालील दगडी पायरीवर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून ती पाण्यात पडून बुडाली, त्यानंतर ती पाण्याच्यावर न आल्याने शुक्रवार पेठेतील पोहणाऱ्या मुलांनी एक ते दीड तास प्रयत्न करून तिला वर आणण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा शोध घेण्यास अडचण येत होती. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर अनिल गोपाळघरे या धाडसी युवकाने पाण्यात खोल बुडी घेऊन कु.सानिकाला बाहेर काढले परंतु डोक्याला मार लागल्याने व तिला पोहता आले नाही त्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यावेळी आई व कुटुंबाचा रडण्याचा प्रचंड आक्रोश झाला, त्यावेळी उपस्थित जनसमुदायाचे सुद्धा मन हेलावून गेले. होते. यावेळी सानिका काशीद हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला, कु. सानिका काशीद हीला पोहता येत असूनही तिचा मृत्यू झाल्याने खर्डा शहरावर शोककळा पसरली आहे. तिच्या मागे आई,वडील व एक भाऊ असा परिवार आहे. याबाबत पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment