पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३मे
मी जामखेडचा भाई आहे, तुला दुकान चालवायचे असेल तर मला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे, पोलीसांना सांगितले तर तुझे दुकान जाळून टाकेन असे म्हणून फिर्यादीच्या खिशातील तीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.
तसेच हातातील चाकूने फिर्यादीच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी एका गावगुंडाने दिली. ही कसली दहशत कायदा व सुव्यवस्था ढासळली का?असाच प्रश्न जामखेड मधील नागरिकांना पडला आहे. सध्या जामखेड मध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत.
प्रताप (उर्फ) बाळू हनुमंत पवार (रा. सारोळा ता. जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी दुकान मालक सुरज शिवाजी जाधव रा. खांडवी ता. जामखेड यांनी काल जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की मी माझ्या कुटुंबासमवेत तालुक्यातील खांडवी या ठिकाणी रहात आहे. माझे जामखेड शहरातील खर्डा चौक याठिकाणी सोन्याचे दुकान आहे. दि ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता माझे नातेवाईक अनिल पवार व मी आमच्या दुकानात बसलो होतो.यावेळी त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी प्रताप उर्फ बाळू हनुमंत पवार रा.सारोळा ता.जामखेड हा माझ्या दुकानात आला व मला म्हणाला की दुकान सुरू ठेवायचे असेल तर मला दर महीन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. तेव्हा मी त्याला देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने मला शिवीगाळ करून म्हणाला की तुला माहित नाही. मी जामखेडचा भाई आहे. आसे म्हणुन मला मारहाण केली व त्याच्या कंबरेला आसलेला धारधार चाकु काढुन माझ्या गळ्याच्या दिशेने फीरवला मात्र मी तो वार खाली वाकून हुकवला. नंतर त्याने अत्ता चे अत्ता दहा हजार रुपये दे असे म्हणत खिशातील तीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.
तसेच तु जर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर तुला जिवे मारुन टाकेल व तुझे ज्वेलर्सचे दुकान पेटवून देईन अशी धमकी दिली. वाद सोडवण्यासाठी फिर्यादी जाधव यांचे नातेवाईक अनिल पवार हा आला असता त्याला देखील शिवीगाळ केली. आरोपी बाळु पवार एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दुकानाबाहेर येऊन हातातील चाकु हवेत फिरवत आरडाओरड करून दहशत दहशत पसरवली त्यामुळे घाबरुन परीसरातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाचे शटर खाली ओढले होते तसेच रस्त्यावरील लोक घाबरून त्या ठिकाणाहून पळुन गेले.
No comments:
Post a Comment