पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१५सप्टेंबर
केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयाचे श्रेय सुद्धा आमदार रोहित पवार घेणार का ? केंद्रीय भाजप सरकार ने राष्ट्रीय महामार्गावरील 20 किलोमीटर अंतरावरील स्थानिक प्रवास करणाऱ्यांना टोल माफी चा निर्णय जाहीर केला आहे .आ रोहित पवार यांनी केंद्रीय नितीन गडकरी साहेबांसोबत फक्त फोटो काढून कर्जत जामखेड मतदार संघातील लोकांना असे भासवितात की हा निर्णय माझ्यामुळे झाला. मुळात हा निर्णय पूर्ण देशात भाजप सरकार ने लागू केला पण कर्जत जामखेड मतदार संघासाठीच फक्त मीचं करतोय आमदार रोहित पवार अशी भूलभूलया किती दिवस करणार ?असा प्रश्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी आमदार रोहित पवारांवर उपस्थित केला आहे.
केंद्राच्या निर्णयाचे श्रेय सुद्धा हे विरोधी पक्षातील आ रोहित पवार घेतायत हा टोल माफीचा निर्णय संपूर्ण देशातच लागू झाला आहे.हा निर्णय केंद्र शासनाचा आहे यात
पण आ रोहित पवार यांचे म्हणणे आहे की कर्जत जामखेड साठी हा निर्णय माझ्यामुळे लागू झाला असा भास निर्माण करण्यात ते पटाईत आहेत.एवढंच नाही तर २०१९ ला फडणवीस साहेबांच्या साक्षीने जामखेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी उजनी वरून पाईपलाईन मंजूर केलेली होती पण दुर्दैवाने २०१९ भाजपचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आले.जामखेडकरांसाठी आमदार.राम शिंदे साहेबांनी मंजूर केलेली पिण्याच्या पाण्याची योजना फक्त उदघाट्ना चा इव्हेंट आ रोहित पवारांनी केला पण प्रत्यक्षात काम केले नव्हते. सुदैवाने राज्यात महायुतीचे सरकार आले आणि योजनेला आ राम शिंदे साहेबांनी पुन्हां गती देऊन आज प्रत्यक्षात जामखेड शहरात पिण्याच्या पाण्याचे योजनेचे काम जलद गतीने सुरु केले लवकरच ती योजना पूर्णतःवास दिसेल आणि याच योजनेचे लोकांर्पण आ राम शिंदे साहेब मंत्री म्हणून लवकरचं करतील. यावेळी कर्जत जामखेडचे एकच सूत्र आपलाच भूमिपुत्र सभापती पै. शरद कार्ले
No comments:
Post a Comment