पोलीस वारंट न्यूज नेटवर्क१३सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे कत्तलीसाठी चाललेले 55 जनावरांचा टेम्पो सकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास खर्डा ते भुम रोडवर शिवपट्टण किल्याजवळ पकडण्यात आला असून त्यामध्ये आठ वासरे मृत होते 47 जनावरे जिवंत आढळून आले आहेत. एकुण किंमत 4 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.१३सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास खर्डा ते भुम रोडवर शिवपट्टण किल्या जवळ, खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर येथे
आयशर कंपनीचा टेम्पो क्र. MH-17-T-3500 यामध्ये खडकत ता. आष्टी जि. बीड येथून धाराशिव येथे वरील वर्णनाचे व किंमतीची जणावरे टेम्पोमध्ये बळजबरीने भरून कत्तली करीता घेऊन जाताना मिळून आले आहेत. तसेच त्यापैकी आठ लहान वसरे मयत मिळून आले आहेत. संकेत रमाकांत सातपुते वय 23 वर्षे व्यवसाय- मजुरी रा. खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी नामे 1) रईस गुलाब पठाण वय 36 वर्षे रा. खडकत ता. आष्टी जि. बीड, 2) राजु (पुर्ण नाव माहीत नाही) रा. खडकत ता. आष्टी जि.बीड, 3) सद्दाम कुरेशी (पुर्ण नाव माहीत नाही) रा. खडकत ता. आष्टी जि.बीड व 4) अकबर टकारी रा. गौस किराणा स्टोअर ता. धाराशिव जि. धाराशिव यांचेविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 325, 3 (5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1995 चे कलम 5 (अ), 5 (ब) तसेच प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 चे कलम 3 व 11 प्रमाणे खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयशर कंपनीचा टेम्पो क्र. MH-17-T-3500 मध्ये 1) 84000/- HF क्राँस जातीचे जर्शी गाईचे काळ्या-पांढऱ्या रंगाचे लहान 42 नर प्रत्येकी किंमत 2000 रूपये प्रमाणे
2) 40000/- किंमतीच्या HF क्राँस जातीच्या 05 जर्शी गाई काळ्या-पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किंमत 8000 रूपये प्रमाणे
3) 00.00/- किंमतीचे HF क्राँस जातीचे जर्शी गाईचे काळ्या-पांढऱ्या रंगाचे लहान 08 मयत नर
4) 3,50,000=00 रूपये किंमतीचे आयशर टेम्पो क्र. MH- 17-T-3500 किं.अं.
अशा प्रकारे 4,74,000 माल आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 325, 3 (5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1995 चे कलम 5 (अ), 5 (ब) तसेच प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 चे कलम 3 व 11 प्रमाणे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सपोनि विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मस्के, पोलीस कॉन्स्टेबल बाळू खाडे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे,पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ मिसाळ यांनी केली आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment