पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१५सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गणेशोत्सव सार्वजनिक उपक्रम राबवून यामध्ये आरोग्य जनजागृती, तसेच वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
यावर्षी एक आगळावेगळा समाज उपयोगी अशा प्रकारे गणेश विसर्जन महाप्रसाद व जनआरोग्य मिरवणूक असा कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अजित देशमुख,डॉ.प्रियांका गोलेकर, प्रा.आ केंद्रातील इतर सहकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाधव सर व इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. सोबत पालकत्व अंतर्गत आरोग्य केंद्राच्या मोकळ्या मैदानात वृक्षारोपण करून या संकल्पनेचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण कुमार जाधव सर, नान्नज प्रा.आ. केंद्राच्या डॉ. वणवे मॅडम, खर्डा परिसरातील सर्व सीनिअर डॉक्टर,पोलिस कर्मचारी आणि प्रा.आ. केंद्र खर्डा परिवारातील सर्व सहकारी , वैदकीय अधिकारी,CHO,ANM, परीचारक, सेवक आशा सेविका यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा केला. यावेळी वृक्षारोपण,महाप्रसाद,आणि शेवटी जनआरोग्य जागृती करून गणेश विसर्जन मिरवणूकीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव व जनजागृती मिरवणुकीचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment