कर्जत-जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी आ. रोहित पवार यांची फिल्डिंग,वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, २८ मे, २०२५

Home राजकीय बातम्या कर्जत-जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी आ. रोहित पवार यांची फिल्डिंग,वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन

कर्जत-जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी आ. रोहित पवार यांची फिल्डिंग,वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन

बुधवार, मे २८, २०२५ राजकीय बातम्या,

कर्जत/जामखेड – 28मे 2025
अहिल्यानगर मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी देताच हे महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी फिल्डींग लावली आहे. यासाठी त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

या महिन्याच्या सुरवातीला राज्य मंत्रिमंडळाची चोंडी (ता. जामखेड) येथे बैठक झाली आणि या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या महाविद्यालयासाठी जागेचा शोधही युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. अहिल्यानगर शहराच्या आसपास अशी जागेचा शोध घेण्यात आला, परंतु पुरेशी आणि सर्व दृष्टीने योग्य अशी जागा उपलब्ध होत नाही. तसंच व्यावहारिक विचार केला तर अहिल्यानगर शहरात विळद घाटात विखे पाटील फौंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय आहे, शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय आहे आणि इतरही मोठमोठी खासगी रुग्णालये आहेत. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही अहिल्यानगर शहराच्या आसपास झाले तर वैद्यकीय सुविधांचे केंद्रीकरण होईल आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी कायमच थेट जिल्याच्या ठिकाणी यावे लागेल. त्यामुळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या जवळ होण्याऐवजी कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे या लगतच्या जिल्ह्यातील गावांना होणार आहे. कारण या सर्व जिल्ह्यांमधील वैद्यकीय सुविधा या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील सीमेवरच्या गावांना त्यांचा फायदा होत नाही. त्यासाठी त्यांना थेट मोठ्या अंतराचा पल्ला कापून जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. परंतु अहिल्यानगरमधील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय हे कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा अहिल्यानगरसह या लगतच्या जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा आहे. विशेष म्हणजे कर्जत-जामखेड मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी आमदार रोहित पवार हे गेल्या २०२२ पासून प्रयत्न करत असून त्यासाठी त्यांनी सरकारकडे पत्रव्यवहारही केला असून हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचा निर्विवाद हक्क असल्याचे आमदार रोहित पवार यांचे म्हणणे असून यासाठीच त्यांनी काल (मंगळवार) वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईत भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली आणि याबाबतचे पत्रही दिले.

मतदारसंघात सर्वच प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार हे गेल्या टर्मपासून करत आहेत. रस्यांचे जाळे निर्माण करणे असो की कर्जत, जामखेड या दोन ठिकाणी प्रत्येकी १०० खाटांचे तर मिरजगाव येथे ५० खाटांचे अशा एकूण तीन उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी आणून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचेही काम आमदार रोहित पवार यांनी केले. तसेच कर्जतमध्ये महिला व बाल रुग्णालयाचा प्रस्तावही शासन स्तरावर प्रलंबित आहे. यासर्व सुविधांचा फायदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व परिचर्या महाविद्यालयासाठी होणार आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचा सरकारने व्यावहारिकपणे विचार केल्यास पुढील काळात कर्जत-जामखेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेले पहायला मिळेल.
--.. . 
कोट 
‘‘कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी २०२२ पासून माझा पाठपुरावा सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघ हे एकदम योग्य ठिकाण आहे. याचा अहिल्यानगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील गावांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय कर्जत-जामखेडमध्येच झाले पाहिजे. सरकारनेही कोणताही भेदभाव न करता गुणवत्तेच्या आधारे मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावं आणि ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी तशी घोषणा करावी, ही विनंती!
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at बुधवार, मे २८, २०२५
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पाटेगाव - खंडाळा MIDC मंजुरीचा विषय पेटला; रोहित पवारांसह मतदारसंघातील युवा ,नागरिक उपोषणावर ठाम

पदवीधर विधान परिषदेसाठी पदवीधर मतदारांनी शांततेत मतदान करावे - सपोनि. प्रकाश पाटील

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत मागील अनेक महिन्यांनपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *