कर्जत-जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद,आ. रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, २८ मे, २०२५

Home राजकीय बातम्या कर्जत-जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद,आ. रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कर्जत-जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद,आ. रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

बुधवार, मे २८, २०२५ राजकीय बातम्या,

कर्जत/जामखेड –28 मे2025
 कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपाठोपाठ आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी काल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. आज (बुधवार) त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि चोंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याबाबत त्यांचे आभार मानले आणि हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी अहिल्यानगर शहराच्या आसपास अशा जागेचा शोध घेण्यात आला, परंतु पुरेशी आणि सर्व दृष्टीने सुयोग्य अशी जागा उपलब्ध झालेली नाही. वास्तविक अहिल्यानगर शहरात विळद घाटात विखे पाटील फौंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय आणि शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय आहे तर इतरही मोठमोठी खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांची कोणतीही गैरसोय होत नाही. त्यातच नव्याने मंजुर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही अहिल्यानगर शहराच्या आसपास झाले तर वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी होतील आणि जिल्ह्यातील लांबच्या रुग्णांनाही उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागेल. त्यामुळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या जवळ होण्याऐवजी कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे या लगतच्या जिल्ह्यातील गावांना होणार आहे. शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी पुरेशी जागा कर्जत-जामखेड मतदारसंघात उपलब्ध होऊ शकते, ही बाब आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना त्यांना सांगितली. तसेच याची घोषणा ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी करण्याची विनंतीही केली. याबाबत राज्याचे अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

कर्जत-जामखेड मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी आमदार रोहित पवार हे गेल्या २०२२ पासून पाठपुरावा करत आहेत आणि आता वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा होताच ते आपल्या मतदारसंघात कसे होईल यासाठी त्यांनी पर्ण ताकद लावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी मांडलेले मुद्द्यांचा विचार केला तर याबाबत कुणाचेही दुमत होणार नाही. कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्याला तर होणार आहेच पण शेजारचे बीड, पुणे, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातील सीमेवरच्या गावांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या मागणीवर राज्य सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते, याकडे कर्जत-जामखेड mi मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 
-----------… 

कोट.

‘‘चोंडीमध्ये (ता. जामखेड) झालेल्या कॅबिनेट बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानले आणि हे महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात करण्याची विनंती केली. याबाबत अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचं त्यांनी आश्वासित केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी ३१ मे रोजी याबाबतची घोषणा करण्याची विनंतीही मुख्यमंत्री महोदायांना केली. याबाबत ते नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, अशी आम्हा कर्जत-जामखेडकरांना अपेक्षा आहे.’’
- रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at बुधवार, मे २८, २०२५
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथे टेम्पोच्या चाकाखाली चिरडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू….खर्डा परिसरात हळहळ व्यक्त
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ जानेवारी घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या परी लखन गायकवाड रा .खर्डा या तीन वर्षीय चिमुकलीस पाण्याच...
  • ५ लाख रुपये दिले, सोने दिले. नवरदेवाने वरमाला गळ्यात टाकली अन् नवरी मात्र दुसऱ्याच दिवशी फरार, खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
      पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१ फेब्रुवारी२०२५ लग्न कराव, सेटल व्हावं अशी अनक लोकांची इच्छा असते. काही जण प्रेमविवाह करतात, पण काह...
  • घरगुती वादात रागाच्या भरात पतीवर त्रिशूल उगारला.. कडेवरील मुलाच्या डोक्यात लागला ; चिमुकल्या मुलाचा मृत्यू
    अहिल्यानगर प्रतिनधी/११ जुलै२०२५ घरगुती वादातून अवाच्य अपघाताची कहाणी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या आंबेगाव पुनर्वसन ...
  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • जामखेड हादरलं! सीएनजी गॅसचा स्फोट ! इर्टीगा कारमध्ये होरपळून जामखेड पोलीस कर्मचारी आणि व्यावसायिकाचा मृत्यू
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/24 फेब्रुवारी 2025 अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये आज पहाटे दुर्देवी घटना घडली आहे. कार डिव्हायडरला धडकल्या...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • मिरजगावात आढळला मृतदेह, खून केल्याचा संशय , मृतदेहाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१०जानेवारी २०२५ कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील रवळगाव येथे एका व्यक्तीचा अनोळखी मृतद...

Popular Posts

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

“‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश

दिवाळी तोंडावर आर्थिक तणाव;"जामखेड तालुक्यातील शेतकऱ्याची कर्ज व नापिकीच्या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या

कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ; सलग ८ चोरीचे गुन्हे उघड; ३.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहरी व धनेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची मंत्री विखे पाटील यांनी केली पाहणीखडकत बंधाऱ्याबाबत मंत्रालयात तातडीची बैठक घेण्याची ग्वाही – मंत्री विखे पाटील

मत्स्यव्यवसायात कौशल्यसह रोजगाराच्या संधी जामखेडमध्ये तीन दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रम व मार्गदर्शन अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपन्न

कानिफनाथ यात्रेनिमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन परिसरातील ग्रामस्थ व तरुणांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे खर्डा पोलिसांसाचे आवाहन

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *