अहिल्यानगर प्रतिनधी/२९मे२०२५
अहिल्यानगर येथे, बुधवारी पोलीस मुख्यालयात जलद गतीने पोलीस अंमलदारांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया दुपारनंतर सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत चालू होती. या बदल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई आणि पोलीस चालक अशा विविध पदांवरील अंमलदारांचा समावेश होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारताच सर्वसाधारण प्रशासकीय बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार बुधवारी सकाळी 9 वाजता बदली दरबार आयोजित करण्यात आला. सुमारे 400 पेक्षा अधिक अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक11, **सहायक फौजदार** 43, **पोलीस हवालदार** 98, **पोलीस नाईक** 25, **पोलीस शिपाई** 194 आणि **पोलीस चालक** 37 अशा विविध पदांवरील अंमलदारांचा समावेश होता.
बदलीसाठी पात्र अंमलदारांकडून पूर्वीच पसंती अर्ज मागवण्यात आले होते. प्रत्येक अंमलदाराला तीन पसंती ठिकाणे नमूद करण्याची संधी देण्यात आली होती. काही अंमलदारांना त्यांच्या पसंतीची ठिकाणे मिळाल्याने समाधान व्यक्त केले, तर काहींनी पसंतीचा विचार न झाल्याने नाराजी व्यक्त केली.
बदली दरबारात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कुलबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश उगले आदी अधिकारी उपस्थित होते.
एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) मध्ये नियुक्ती मिळविण्याची अनेक अंमलदारांना आशा होती, पण गेल्या पाच वर्षांपासून एलसीबीत नवीन नियुक्त्या झाल्या नसल्याने यंदासुद्धा एलसीबीमध्ये बदली न झाल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा