खर्डा प्रतिनधी/३० मे२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा गावामध्ये काल दि 29 मे 2025 रोजी चौंडेश्वरी मंदिराजवळ ग्रामसभा आयोजित करण्यात आली, खर्डा ग्रामपंचायत ही जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे.परंतु १७ सदस्यांपैकी फक्त ५ सदस्यच उपस्थित होते. ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच संजीवनी पाटील यांना मिळाले होते. या बैठकीत ग्रामसेवक बबन बहिर यांनी घरकुल ऑनलाईन अर्ज भरल्याबाबत माहिती दिली, आतापर्यंत ३०१ जणांनी ऑनलाईन फॉर्म भरले असून उर्वरित फॉर्म भरण्यास दोन दिवस शिल्लक असल्याचे माहिती ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना सांगितले.
ग्रामसभेत गावातील विकासासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वार्डांमधून विविध समस्या आणि तक्रारी देखील लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या. पावसाळी काळात आरोग्याची काळजी घेण्याबाबत चर्चा झाली असली, तरी आरोग्य विभागातील अधिकारी ग्रामसभेला अनुपस्थित होते. यावेळी सरपंच संजविनी पाटील, ग्रामसेवक बबन बहिर ग्रामपंचायत सदस्य आसाराम गोपाळघरे,सुग्रीव भोसले, महालिंग कोरे, मदन पाटील आणि खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
शुक्रवार, ३० मे, २०२५
Home
खर्डा शहर
ग्रामसभा आयोजित केली तरी सदस्यांचे उपस्थिती अभाव- खर्डा गावातील ग्रामसभा: १७ पैकी ५ सदस्यच हजर,घरकुल ऑनलाईन अर्जांसाठी ग्रामसभेत माहिती देण्यात आली
ग्रामसभा आयोजित केली तरी सदस्यांचे उपस्थिती अभाव- खर्डा गावातील ग्रामसभा: १७ पैकी ५ सदस्यच हजर,घरकुल ऑनलाईन अर्जांसाठी ग्रामसभेत माहिती देण्यात आली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा