जामखेड येथे करमाळा व खर्डा रोड जोडणाऱ्या चौफुला चौकाचे दि. ३१ मे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक” असे नामकरण करण्यात येणार आहे. या सुवर्णसोहळ्यासाठी अनेक अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिक ध्वजस्तंभ उभारणीची तयारी करत आहेत. त्या दिवशी या चौकावर ३०० तोफांची सलामी देखील दिली जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी आणि मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. मोगलांनी नाश केलेली मंदिरे त्यांनी पुनःस्थापित केली आणि शंभूराजांच्या बलिदानानंतर सांस्कृतिक व धार्मिक रक्षणाचे मोठे कार्य पार पाडले. जामखेड तालुक्यातील चोंडी हे त्यांचे जन्मस्थान असून दरवर्षी लाखो शिवभक्त त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी तेथे येतात.
जामखेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक उभारण्याची अनेक वर्षे धारकऱी शिवप्रेमींमध्ये भावना होती. त्यामुळे करमाळा-खर्डा-नागेश्वर चौकात त्यांचे नामकरण राबवले जात आहे. याशिवाय अहिल्यादेवींच्या स्मारकासाठीही पुढील तयारी केली जाईल. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याने केले आहे.
जामखेड प्रतिनधी/30मे 2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा