खर्डा प्रतिनिधी:३१ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल विद्यालयाचे २०२२ मध्ये एन एम एम एस परीक्षामध्ये घवघवीत यश मिळवले आहे यामध्ये चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत
कृष्णा संतोष जोरे,कु. श्रुती श्रीकांत भागवत, कृष्णा विकास शिंदे,विजय रामहरी जायभाय हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले .
यशस्वी झालेले विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक बुद्धिमत्ता - श्री विशाल आठवले ,गणित - दिपक टाफरे ,विज्ञान - श्री शिवाजी आगे ,विभागप्रमुख - श्री वसावे कांतीलाल या सर्व शिक्षकांचे प्राचार्य सोमनाथ उगले , उपमुख्याध्यापिका सौ दुधाळ मॅडम, पर्यवेक्षक रमेश पाटील तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री. किशोर कांकरिया, डॉ. विवेक दिंडोरे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. प्रवीण कुंभार व खर्डा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य चेअरमन, पत्रकार, परिसरातील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
No comments:
Post a Comment