खर्डा प्रतिनिधी : ३१आगस्ट
खर्डा इंग्लिश स्कूल समोरील वाढते आपघात व गाड्यांचा वाढणारा वेग नियंत्रित करण्यासाठी खर्डा पोलीसांच्या वतीने शाळेसमोरील गतीरोधक ( स्पीड ब्रेक) ला पांढरे पट्टे, शाळेचे बोर्ड. नो पार्किंग बोर्ड व बॅरिकेट लावून घेण्यात आले आहेत.
जामखेड नंतर खर्डा हे तालुक्यातील मोठे शहर आहे. या भागातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी या ठिकाणी नुकतीच नवीन पोलीस स्टेशनची निर्मीती करण्यात आली आहे. या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी गुन्हेगारी नियंत्रित करण्याबरोबरच सामाजिक दृष्टिकोनातून इतरही विषयांवर काम सुरू केले आहे. त्यानुसार शहरालगत असलेल्या खर्डा इंग्लिश स्कूलच्या समोरील रस्त्यावर वाढते अपघात व स्पिड कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कारण या ठिकाणी मोठा उतार आहे. शाळा सुरू असताना शेकडोंच्या पटीत येथे विद्यार्थ्यी, शिक्षक व कर्मचारी यांची ये-जा असते. तर याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्यवसाईकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. परिणामी येथे मोठी रहदारी असते. तसेच शाळा सुरू असल्यावर रोड रोमीयो व टवाळखोरही दुचाकीवरून विनाकारण चकरा मारत असतात. तसेच हा मुख्य रस्ता असलेल्या जामखेड, भुम व जातेगाव कडून येणाऱ्या प्रवाशी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही रहदारी मोठी आहे.
परिणामी या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी खर्डा पोलीसांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार खर्डा इंग्लिश स्कूल समोर अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे व त्या ठिकाणी शाळा असल्यामुळे खर्डा पोलीस स्टेशन यांच्याकडून यांच्याकडून
खर्डा इंग्लिश शाळेसमोरील गतिरोधकला पांढरेपट्टे नसल्यामुळे अपघाताची भीती होती तसेच शाळेमध्ये जाणारे मुलांना रस्ता क्रॉस करताना भीती असल्यामुळे स्पीड ब्रेकर ला पट्टे मारण्याकरिता पाठपुरावा करून स्वतः क्रॉस पट्टी मारून घेण्यात आली आहे
अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे व त्या ठिकाणी शाळा असल्यामुळे खर्डा पोलीस स्टेशन यांच्याकडून यांच्याकडून स्पीड ब्रेकर. शाळेचे बोर्ड. नो पार्किंग बोर्ड. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी बॅरिकेट लावून घेतले आहेत. दोन्ही गतीरोधकांना पांढरे पट्टे, शाळेचे बोर्ड. नो पार्किंग बोर्ड व बॅरिकेट लावून घेण्यात आले आहेत. ही कामे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी स्वतः उभे राहून करून घेतली आहेत. पोलीसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment