दि. १० सप्टेंबर पासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पशुपालक शेतकरी व व्यापारी यांनी जनावरांचा बाजार बंद ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डी. ए. घोडेचोर यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यात लंम्पी रोगाची लागण झालेली जनावरे सापडली असून त्याचा प्रसार वाढू नये यासाठी बाजार बंद ठेवण्याचे सहकार्य करावे असे आव्हान केले आहे
जामखेड येथे भरणारा जनावरांचा बाजार हा जामखेड व परिसरातील सर्वात मोठा बाजार आहे. महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांचे दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजीच्या अधिसुचनेने लंम्पी रोगाचा प्रार्दुभाव वाढु नये म्हणुन शनिवार दिनांक १० सप्टेंबर २०२२ पासुन पुढील आदेश येई पर्यंत कृषि उत्पन्न बाजार समितीचा जनावरे बाजार ( गाय , म्हैस , बैल ) बंद राहिल . परंतु शेळी , मेंढी बाजार नियमितपणे सुरु राहतील अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तरी सर्व शेतकरी व व्यापारी यांनी नोंद घ्यावी. तसेच सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांस तात्काळ लंपी आजारा पासुन संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे व बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डी. ए. घोडेचोर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment