खर्डा प्रतिनिधी : ९ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पंचक्रोशीतील अनेक तरूण नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बल भरती प्रक्रियतून सुरक्षा बलात भरती झाले आहेत. यानिमित्ताने त्यांचा यथोचित सन्मान व्हावा तसेच इतर तरुणांनाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी खर्डा येथील सरपंच आसाराम गोपाळघरे व खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महालिंग कोरे यांनी केले होते.
महाराष्ट्र सुरक्षा बलात भरती झालेले युवक दादा मिसाळ (गीतेवाडी), भाऊसाहेब गोपळघरे(गीतेवाडी), दिलीप होडशील (गीतेवाडी), मच्छिंद्र गोपाळघरे (मोहरी), अरुण गोपाळघरे (नागोबाचीवाडी), अतिश सानप (दरडवादी), परमेश्वर जायभाय (जायभायवाडी) यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थितीत खर्डा पोलीस स्टेशन चे सपोनि प्रकाश पाटील, सरपंच आसाराम गोपाळघरे मा.सरपंच संजय आबा गोपळघरे, सहदेव शिंदे,जय भगवान युवा मंच अध्यक्ष गोरख गोपाळघरे , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, सोपान गोपाळघरे, महालिंग कोरे,नवनाथ होडशीळ, बाजीराव गोपाळघरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment